Ad will apear here
Next
‘संजीवन’मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वृक्षारोपण
पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद यांच्या उपस्थितीत कॉलेज परिसरात वृक्षारोपण केले. महाराष्ट्र सरकारच्या एक ते सात जुलैपर्यंत चार कोटी वृक्ष लागवडीच्या निर्धारात सहभाग म्हणून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात स्वतः श्रमदानातून खड्डे खणले. ‘आव्हान नवे पेलू चला, हिरवे रान फुलवू चला’ अशा अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी या वेळी दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आणि क्रीडा शिक्षक प्रा. रणजित इंगवले यांनी केले होते. त्यांना एस. बी. जाधव, नितीन बहादुरे व उद्यान विभागातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रमुख सौरभ पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी सौरभी कुरणे यांच्यासह सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, संजीवन संस्थेचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZRJBE
Similar Posts
‘संजीवन’मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पन्हाळा : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१७-१८ साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. विशाल पाटील यांनी मनोगतातून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ
‘संजीवन’च्या १००हून अधिक विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड पन्हाळा (कोल्हापूर) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  अलीकडेच आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी देशातील नामांकित कंपन्या आल्या होत्या. यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली.   महाविद्यालयातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. ‘सीएमएस, कल्याण’ या कंपनीमध्ये २१
‘संजीवन’च्या विद्यार्थ्याचा पेटंटसाठी अर्ज पन्हाळा (कोल्हापूर) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथमेश प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याने ‘मेथड अँड सिस्टीम ऑफ परफॉर्मिंग अॅन अॅक्शन ब्राउझर बेस्ड ऑन ए व्हॉइस कमांड’ या विषयावर पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारच्या ‘कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाइन’ या विभागाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे
‘संजीवन अभियांत्रिकी’ मध्ये ‘आरसीसी डिझाईन’बद्दल कार्यशाळा पन्हाळा (कोल्हापूर) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थापत्य विभागातर्फे ‘बेसिक आरसीसी डिझाईन’ या विषयावर ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बाजारात उपलब्ध असलेले प्रगत सॉफ्टवेअर वापरून डिझाईन (संरचना) कसे केले जाते हे शिकवण्यात आले. या कार्यशाळेत, कोल्हापूर येथील डी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language